अखेर ‘त्या’ तरुणीचे निधन.


आश्वी : प्रतिनिधी ;- ह्रदय व किडणीच्या असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील बाली नामदेव सातपुते या २० वर्षीय तरुणीचे निधन झाले. या तरुणीच्या घरची अर्थिक परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने तिच्यावर पुढील उपचार करणे या कुटुंबासाठी कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी या तिला घरी आणले होते. दरम्यान, तिच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तीनी मदत करावी, असे आवाहन आश्वी खुर्द ग्रामस्थानी केले होते. मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत माळवली. यामुळे सातपुते कुटुंब व आश्वी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. मयत बालीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सातपुते कुटुंबावर मोठे कर्ज झाल्याने या कुटुंबाला दानशूर व्यक्तीनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन आश्वी खुर्द ग्रामस्थानी केले आहे.