आदर्श पत्रकारिता पुरस्कार उमाकांत भोगेना प्रदान


नेवासाफाटा/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील पत्रकार उमाकांत भोगे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गेल्या १२ वर्षापासून संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजात उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्तींना समितीचे अध्यक्ष भारत कांबळे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुरस्कार व गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात केले जाते. 

यावर्षी खरवंडीचे रहिवाशी पत्रकार उमाकांत भोगे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात उमाकांत भोगे रंगनाथ देव्हारे, विठ्ठलराव शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी जिद्दी ग्रुपचे अध्यक्ष जगदीश सुरवसे, मुळाचे माजी संचालक भीमराज शेंडे, खरवंडी माजी सरपंच सिद्धार्थ भोगे, संतोष सुरवसे, अजित भोगे , कैलास चौधरी, अशोक भोगे, अनिल पुंड, अशोक चिंधे, सतीश कुर्‍हे, हसणभाई सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.