Breaking News

बेलापुर -परळी प्रलंबित रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वेचे जनरल मॅनेजरकडे सादर


कुकाणा / प्रतिनिधि / - बेलापुर- नेवासा -शेवगाव-गेवराइ-परळी (बेलापुर- परळी) या प्रलंबित रेल्वे मार्गाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडून मुंबई येथील रेल्वेचे जनरल मॅनेजर यांचेकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाची प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडून बेलापुर-परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांना प्राप्त झाली आहे 
याबाबत माहिती अशी की, वरील रेल्वे मार्ग ९६ वर्षापासून प्रलंबित तसेच या मार्गाचे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने करुन तो न परवडनारा सर्वे रिपोर्ट सादर केल्याच्या विरोधात कुकाना येथील नागरिकांनी १/१२/१७ ते ७/१२/१७ या कालावधीत आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत रेल्वेचे उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी जून २०१८ पर्यंत सर्वे पूर्ण करुन अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविन्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मी व्यक्तिश लक्ष घालतो असे लेखी दिले. तत्पूर्वी जिल्ह्याकडून हा प्रस्ताव राज्याकडे जाणे गरजेचे होते, त्यानुसार सेवा संस्थेच्या वतीने या रेल्वे मार्गासंदर्भात सर्व पुरावे देऊन प्रस्ताव तातडीने पाठविण्याची मागणी केली. परंतु या प्रस्तावासाठी वेळकाढूपणा होत असल्याने सेवा संस्थेने औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. यावर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभय महाजन प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, जमीन विभागाच्या उज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटिल, सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी, गणेश मोढवे आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी अहवाल रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना पाठविण्यात आल्याचे सांगितले. त्या अहवालाची प्रत भंडारी यांना देण्यात आली आहे. अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर झाल्याने कुकाना व परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यभर गाजलेल्या आमरण उपोषणाचे चीज झाल्याचे जनतेतून बोलले जात आहे.