Breaking News

ग्रामदैवत संत शेख महंमद महाराजांच्या वार्षिक यात्रेत कुस्त्यांचा रंगला फड


श्रीगोंदा/शहर प्रतिनिधी/- येथील ग्रामदैवत संत शेख महंमद महाराजांच्या वार्षिक यात्रा उत्सवा निमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा मंगळवारी पार पडला. वजनी गटा नुसार या कुस्त्या पार पडल्या. मंगळवारी,२७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता महंमद महाराजांच्या मठा जवळ कुस्त्याना प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजे पर्यंत कुस्त्या सुरू होत्या. मंगळवारी सकाळीच गटानुसार जोडी ठरवल्याने दरवर्षी आखाड्यात होणारा गोंधळ यावेळी मात्र झाला नाही. पर्यायाने कुस्तीप्रेमीनी कुस्त्यांचा मनमुराद आनंद लुटला. विजेत्या मल्लांना यात्रा उत्सव समितीच्या वतीने बिदागी देण्यात आली. या आखाड्यात नगर जिल्ह्यासह, महाराष्ट्र व परराज्यातून मल्लांनी हजेरी लावली. यात्रा उत्सव समितीच्या वतीने नगरसेवक अशोक आळेकर व पोपटराव खेतमाळीस यांनी सर्वांचे स्वागत केले. तर अध्यक्ष गोपाळ मोटे यांनी आभार मानले. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप, तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, शिवसेना नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, सदाशिव पाचपुते, नगराध्यक्ष मनोहर पोटे, बापूसाहेब गोरे, राजू गोरे, नगरसेवक अशोक खेंडके, नानासाहेब कोथिंबीरे, सुनील वाळके, एम. डी. शिंदे, डॉ. भाऊसाहेब होले, दीपक शिंदे, संतोष खेतमाळीस आदींसह तालुक्यातील नेते मंडळी व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.