रामदास पाटील कोरडे पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
यावेळी विद्यालयातील मातोश्री उगमदेवी मेघराजजी दोशी सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुक्तेश्वर शुगर मिल्सचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब पटारे हे होते. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका वंदना मरकड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अध्यापक संजय पंडित यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी कोरडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतांना म्हटले की, जीवनात उंच भरारी घेत असतांना आपल्या आई वडिलांसह गुरुजन व विद्यादान करणाऱ्या विद्यालयास कधीही विसरू नका. त्यांची उतराई होण्याचा प्रयत्न करा. असे आवाहन केले.यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेपयोगी साहित्य शाळेस भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक संजय पंडित यांनी केले.