विशेष पोलीस पथकाचा मटका अड्ड्यावर छापा
सांगली, दि. 29, डिसेंबर - सांगली पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने शामरावनगर परिसरात छापा टाकून मटकाकिंग गणेश यल्लाप्पा दोड्डमणी याचा मटका अड्डा उदध्वस्त केला. या छाप्याची चाहूल लागताच गणेश दोड्डमणी फरारी झाला असून त्याच्या तिघा साथीदारांना या विशेष पोलिस पथकाने अटक केली आहे.
अटक केलेल्यात संतोष शिवानंद दोड्डमणी, संतोष बाबूराव काळे व राकेश अनिल मुळे (तिघेही रा. सांगली) या तिघांचा समावेश आहे. या तिघांकडून दोन दुचाकी, मटका सा हित्य व रोख रक्कम असा एकूण दीड लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शामरावनगर परिसरातील मौलाना आझाद शाळेनजीक गणेश दोड्डमणी हा मटक ा अड्डा चालवित असल्याची माहिती या विशेष पोलिस पथकाला मिळाली होती. या माहितीआधारे या पोलिस पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
