फ्लॅट देतो असे सांगून ग्राहकाची 25 लाखांची फसवणूक
फलटण शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मनोज शिंदे (रा. मलठण, फलटण) यांनी फलटण शहारालगत असणार्या बीरदेवनगर (जाधववाडी) येथील गृह प्रकल्पात फ्लॅटची नोंदणी केली होती.
12 लाख रुपये किमतीच्या फ्लॅटसाठी शिंदे यांनी बिल्डर नितीन भोसले यांना वेळोवेळी 12 लाख रुपये पोहोच केले होते. मात्र, भोसले यांनी शिंदे यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. उलट फ्लॅटची रक्कम मिळूनही शिंदे यांचा विश्वास संपादन करून त्याच फ्लॅटवर 12 लाख रुपये कर्ज काढले. शिंदे यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी याबाबत भोसले यांच्याकडे विचारणा केली असता भोसले यांनी शिंदे यांना दमदाटी केली.
त्यानंतर शिंदे यांनी मध्यस्थीने व विनवण्या करून भोसले यांचेकडे फ्लॅटच्या ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त गेलेल्या पैशांची मागणी केली असता, भोसले यांनी शिंदे यांना सात लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेशही वटला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याच्या भीतीने शिंदे यांनी गुरुवारी सकाळी फलटण शहर पोलीस ठाण्यात नितीन महादेव भोसले यांच्या विरोधात दमदाटी आणि फसवणुकीची तक्रार दिली आहे.
Post Comment