Breaking News

पंजाबमध्ये दोन शिवसेना नेत्यांची हत्या


नवी दिल्ली - पंजाबमधील शिवसेनेचे स्थानिक नेते सतपाल शर्मा आणि दुर्गाप्रसाद गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने शनिवारी 'खलिस्तान लिबरेशन फोर्स' या अतिरेकी संघटनेच्या १५ सदस्यांविरोधात दोन आरोपपत्र दाखल केली आहेत.. मोहाली येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात ही आरोपपत्र एनआयएने दाखल केली. 

१५ संशयितांवर भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. 'डेरा सच्चा सौदा'चे अनुयायी असलेल्या सतपाल शर्मा आणि त्यांचा मुलगा कुमार यांची गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी लुधियानाच्या जागेडा परिसरातील 'नाम चर्चा घर' येथे हत्या करण्यात आली होती. तर गुप्ता यांची हत्या लुधियानामध्येच २३ एप्रिल २०१६ रोजी झाली होती