सोलापूर, दि. 21, जानेवारी - सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट (एनटीपीसी) सोलापूरतर्फे 11 ते 17 जानेवारी या दरम्यान सडक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. क र्मचारी, एनटीपीसी परिवार व मुलांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पाचे प्रमुख देबब्रत पॉलच्या नेत ृत्वाखाली सुरक्षेची शपथ घेण्यात आली. यावेळी वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगणारे लघुपटही यावेळी विद्यार्थ्यांना व कर्मचार्यांना दाख विण्यात आले. सुरक्षा विषयक प्रश्न तयार करून त्याची उत्तरे कर्मचारी, मुलांकडून लिहून घेण्यात आली. नंतर त्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षणही देण्यात आले. सुरक्षेचा संदेश लोकांमध्ये पोहोचावा म्हणून 16 जानेवारी रोजी एनटीपीसीतील सर्व कर्मचारी, सीआयएसएफचे जवान आदींनी परिसरात जनजागृतीपर रॅली काढली.
एनटीपीसीतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह, जनजागृतीपर रॅली
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:42
Rating: 5
Post Comment