पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा - अभिजीत राऊत
राऊत म्हणाले, पोलिओ रोगाचा सर्वाधिक धोका बालकांना असतो. त्याच्यावर उपचार नसून प्रतिबंध हाच उपचार आहे. केवळ शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्र तिबंधक लसीच्या ठराविक अंतराने दोन लसी दिल्यास पोलिओची बाधा होण्याची शक्यता उरत नाही. तसेच, भावी पिढ्यांवर पोलिओमुळे उद्भवणारे अपंगत्वाचे सावट कधीही पडणार नाही. या व्यापक दृष्टीकोनातून पोलिओ निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी याचा लाभ पाच वर्षे वयोगटाखालील बालकांना मिळावा, यासाठी पालकांनी सजग राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Post Comment