पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘सौभाग्य’ योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली, दि. 26, सप्टेंबर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (सोमवार) ‘सौभाग्य’ या एका मोठ्या योजनेची घोषणा केली. या योजनेत अनेक वेगवेगळ्या योजनांचा  समावेश करण्यात आला आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकार सौभाग्य योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज  कनेक्शन दिलं जाणार आहे. जनगणनेच्या आधारावर ही सुविधा दिली जाणार आहे. 16 हजार 320 कोटींची ही योजना आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश,  ओदिशा या राज्यातल्या जनतेला सौभाग्य योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत 5 एलईडी बल्ब, पंखा आणि सोलार पॉवर पॅक वाटले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी गरीब जनतेसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा करतील अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती. दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय  कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, पंडित दिनदयाळ यांच्या नावानं पंतप्रधान मोदी ‘सौभाग्य’ ही मोठी योजना जाहीर केली आहे.  याबाबत त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन माहिती देण्यात आली.