Breaking News

महाजनांचं अगाध ज्ञान आणि कोलांटउडी

दि. 07, नोव्हेंबर -भाजपच्या नेत्यांना काय झालं आहे, हेच कळत नाही. अगोदर वादग्रस्त वक्तव्यं करायची आणि अंगलट आली, की मग ते वक्तव्य विनोदासाठी होती, असं  सांगायचं, असं सर्वंच नेत्यांच्या बाबतीत होत आहे. गिरीश महाजन हे खरं तर  राज्याच्या मंत्रिमंडळातील जलसंपदा खात्याचे मंत्री विनोदी म्हणून प्रसिद्ध नाहीत; परंतु कधी कधी  ज्यांच्याशी आपला संबंध नाही, अशा विषयात नाक खुपसलं, तर जे व्हायचं, तेच महाजन यांचंही झालं. जाहिरातीत महिलांचा नको तिथंही वापर केला जात असतो. दाढी करण्याच्या  सामानाच्या जाहिरातीतही महिला दिसतात. मॉडेल म्हणूनही महिलाच मोठ्या संख्येनं असतात. महिलांची नावं दिल्यानं दारूविक्रीचा धंदा वाढतो, असं व्यापारी मार्गदर्शन गिरीश  महाजन यांनी केलं. खरं तर मद्य विक्रीला महिलांचा विरोध असतो. गावात मतदान घेऊन पन्नास टक्क्क्यापेक्षा जास्त लोकांनी बाटली आडवी करण्याच्या बाजूनं मतदान केलं, तर  तिथं दारूबंदी करण्याचा राज्य सरकारचाच निर्णय आहे. दुसरीकडं ग्रामसुरक्षा दलाला मजबूत करून त्याच्या माध्यमातून गावां-गावंत दारूबंदी करण्याची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा  हजारे यांनी केली आहे. गेल्या एक मे रोजी राज्यात ठिकठिकाणी ग्रामसभा घेऊन दारूबंदी करण्याचे ठराव झाले. त्याची अंमलबजावणी करण्याचं राहिलं बाजूला. उलट, राज्याचे  दोन मंत्री बिअर बारचं उद्घाटन करतात. तिथं महाजन यांच्याकडून तरी वेगळ्या वक्तव्याची एपक्षा कशी करावी? महाजन यांचेच एक सहकारी त्यांचा चंद्रपूर जिल्हा पूर्णता: दारू बंदीचा जिल्हा करतात, तिथं महाजन मात्र दारूचा खप कसा वाढेल, याचाच विचार करतात. अर्थात मद्यापासूनचं उत्पादनश्ाुल्काचं उत्पन्न वाढावं, यासाठी राज्याच्याच एका  मंत्रालयाचा प्रयत्न असतो. या पार्श्‍वभूमीवर महाजन यांचं विधान तपासून पाहायला हवं. त्यांचं विधान अर्धसत्य आहे. 
महाजन यांनी दारूविक्री वाढावी यासाठी कंबर कसली आहे. दारूविक्री कमी झाल्यामुळं राज्याचं उत्पन्न कमी झालं, ही चिंता सरकारला सतावीत आहे. त्यामुळं दारूविक्रीत वाढ  व्हावी, यासाठी दारूला महिलांची नावं द्यावीत, असं बेधुंद विधान महाजन यांनी केलं आहे. महाजन हे साधनशूचिता वगैरे मानणार्‍या संघाचे स्वयंसेवक आहेत. राष्ट्र्ीय स्वयंसेवक  संघानं कायम चांगले संस्कार दिले. संस्काराचा मक्ताही फक्त संघाकडं असतो; परंतु संघाचे अनेक स्वयंसेवक जसे नापास झाले, तसंच महाजन यांच्याबाबतीतही झालं आहे.  महाराष्ट्रात  अनेक ठिकाणी महिलांची दारूविक्रीविरोधात आंदोलनं सुरूच आहेत. बाटली आडवी करण्याच्या या आंदोलनात हजारो महिला सामील झाल्या आहेत. अशावेळी म हिलांनाच दारूविक्रीचे बˆॅण्ड अ‍ॅम्बेसेडर करावं, अशी सूचना महाजन यांनी  करावी हे धक्कादायक आहे. नंदुरबार जिह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप  हंगामाच्या वेळी महाजन यांनी मद्याला महिलांची नावं देण्याचं अगाध ज्ञान पाजळलं. कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी मंत्र्यांसमोर आमच्याकडं डिस्टिलरी पˆकल्प असून दारू ची विक्री घटली आहे, अशी खंत व्यक्त केली. मंत्र्यांनी जणू वडीलकीच्या नात्यानं अनुभवी सल्ला दिला व दारूविक्री वाढविण्याचा रामबाण उपाय सांगितला.चेअरमनसाहेब रडू  नका, दारू उत्पादनांना महिलांची नावं दिल्यावर त्यांची बाजारात विक्री वाढते. सध्या सातपुडा साखर कारखाना बनवीत असलेल्या दारूचं नाव महाराजा असं आहे. त्याचं नाव  महाराणी करावं, असं महाजन यांनी सांगितलं. महाजन यांनी आणखी पुरवणी माहिती देऊन या क्षेत्रातील आपण डॉक्टरेट मिळविल्याचं दाखवून दिलं.
राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावच्या शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखान्यातील दारूचं नाव भिंगरी आहे. भिंगरी हे महिलेचं नाव नाही, हे  त्यांना माहीत नसावं.  शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्यात निर्माण होणार्‍या दारूचं नाव ज्युली असं आहे, असं महाजन यांनी म्हटलं असलं, तरी कोल्हे यांच्या संजीवनी क ारखान्यात तयार होणार्‍या मद्याचं नाव बॉबी आहे, ज्युली नव्हे. या दोन मद्यांचा खप जास्त आहे. त्याला महिलांची नावं आहेत, म्हणून नाही, तर त्यांचा एक फॉर्म्युला ठरला आहे.  त्यानंतर तिसर्‍या क्रमांकाचा खप पद्मश्री विखे कारखान्याच्या रॉकेटचा आहे. ते नाव महिलेचं नाही. महाजन यांनी भिंगरी, ज्युली, महाराणी अशा बˆॅण्डची जाहिरातबाजी केली; पण  दारूच्या बाटल्यांना महिलांची नावं दिल्याशिवाय पर्याय नाही असंही एक पˆकारे सुचविले. एवढंच नव्हे तर आपल्या या तर्कटासाठी त्यांनी गुटख्याचीही साक्ष काढली. गुटख्याला  विमल, केसर अशी नावं आहेत आणि गुटख्यावर बंदी असूनही हे बˆॅण्ड विकले जातात, असं सांगणार्‍या महाजन यांना माणिकचंद गुटख्याचा खप जास्त होता, हे लक्षात आलं  नसावं.  बेवडे व्हा, गटारात लोळा आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घ्या, असाच हा महाजनी सल्ला दिसतो. आपल्या विधानामुळं वादंग होतो, हे लक्षात आल्यानंतर महाजन  यांनी त्यांच्या वादगˆस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. महाजन यांनी केलेल्या विधानामुळं दारुबंदी आंदोलनातील पˆमुख कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांच्या  विरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वाद वाढत चालल्याचं बघितल्यानंतर महाजनांनी दिलगिरी व्यक्त करणं पसंत केलं. मी जे वक्तव्य केलं, ते  विनोदाचा भाग म्हणून मी बोललो होतो. दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून मी माफी मागतो अशा शब्दात महाजनांनी माफी मागितली. चंद्रपूर, ठाण्यासह  राज्याच्या अन्य भागांत  महाजनांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे सत्र सुरू झाले असून, त्यानंतर त्यांना ही पश्‍चातबुद्धी आली आहे. आपच्या पˆीती मेनन यांनी महाजन  यांनी महिलावगार्ची माफी मागावी; अन्यथा महिलांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल, असा इशारा दिला होता. राष्ट्रवादीच्या पˆदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी महाजन  यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला, तर काँगˆेसचे पˆदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील कठोर शब्दांत महाजन यांचा समाचार घेतला. नाशिक आणि सोलापुरात त्यांच्या  प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.