मुख्यमंञ्यांचे दुर्लक्ष शहर इलाखा विभागाच्या गैरव्यवहाराला जबाबदार
भ्रष्ट अभियंत्यावर साबां मंञ्यांचा वरदहस्त
मुंबई (विशेष प्रतिनिधी), दि. 07, नोव्हेंबर - पारदर्शक कारभाराच्या झारीत प्रशासनातील शुक्राचार्य अडथळा आणतात असा आरोप करणारे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साबां मंञ्यांची भ्रष्टनितीला पाठबळ देण्याची भुमिका का दुर्लक्षित करतातअसा सवाल साबां प्रशासनातून उपस्थित केला जात आहे.मनोरा आमदार निवास इमारतीच्या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या शहर इलाखा विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता यांना मंञ्यांनी दिलेले पाठबळ, भुजबळ क्लीन चीट अहवाल प्रकरणी संशय व्यक्त झालेले तत्कालीन कार्यकारी अभियंता,अधिक्षक अभियंता ,मुख्य अभियंता यांच्या गैरप्रकाराकडे कानाडोळा करून साबां मंञ्यांनी त्यांच्या इच्छीत स्थळी बदलीसह बढतीची खैरात केली.ज्यांना सजा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतांना त्यांचे पुनःर्वसन करणार्या सरकारचा मुखीया प्रशासनाला नाहक आरोपीत करून मानसिक ञास देत असल्याची भावना मुळ धरू लागली आहे.मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर सरकारच्या पहिल्या वर्षापूर्तीनंतर पारदर्शक कारभाराच्या अंमलबजावणीत प्रशासनाचा नाकर्तेपणा मोठा अडसर ठरत असल्याची खंत व्यक्त केली होती.सरकारच्या तिसर्या वर्षपुर्तीलाही ही खंत मुख्यमंञ्यांनी पुन्हा बोलून दाखवली.
प्रशासनाच्या लाल फितीचा कारभार सर्व सरकारची डोकेदुःखी ठरते.अशी खंत पायउतार झालेल्या अनेक राज्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.यावरून मुख्यमंञी फडणवीस यांना अल्पावधीत आलेला हा अनूभव अपवाद नाही.हे खरे असले तरी मंञीमंडळातील सहकारी मंञ्यांच्या कर्तृत्वावर मुख्यमंञ्यांचा नसलेला अंकूश किंबहूना जाणिवपुर्वक केलेले दुर्लक्ष या गोष्टी प्रशासनाच्या नाकतेपणाला जबाबदार आहे.किमान साबां प्रशासनाच्या बाबतीत मुख्यमंञ्यांचा हा हलगर्जीपणा पारदर्शक कारभाराच्या मुळावर उठला असल्याची चर्चा मुख्यमंञ्यांच्या पुनरूच्चारानंतर जोरा धरू लागली आहे.या विषयी सुरू असलेली चर्चा केवळ चर्चा नाही तर या चर्चेला पुरक संदर्भही साबां प्रशासनाकडून दिले जात आहेत.
महाराष्ट्र साबांत झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कारवाई झालेले माजी साबां मंञी छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीलाही लाजवण्यासारखा कारभार सध्या साबांत सुरू आहे.या कारभाराची सारी सुञे साबां मंञालयात एकवटल्याने अवघे प्रशासन बाहुले बनवून नाचविले जात आहे.त्याचा फायदा मंञ्यांशी स्नेहबंध निर्माण करून खात्यातील भ्रष्ट अभियंते लाटत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
भुजबळ यांच्या संदर्भात क्लीन चीट अहवालाचे प्रकरण वादग्रस्त ठरले होते.या अहवालात झालेल्या हेराफेरीने प्रशासनाचीच नव्हे सरकारचीही अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली होती.या अहवालाची निर्मिती जाणिवपुर्वक करून क्लीन चीट देण्यामागे तत्कालीन मुंबई साबां प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता,तत्कालीन अधिक्षक अभियंता आणि तत्कालीन कार्यकारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे सिध्द झाले होते.सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ पाहणारे हे प्रकरण साबां मंञालयाच्या हस्तक्षेपामुळे दडपण्यात आल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणाशी संबंधाने चर्चेत आलेल्या शहर इलाखाच्या त्या सर्व अभियंत्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असतांना कुणाला नाशिक तर कुणाला औरंगाबादला बढतीवर बादली दिली गेली.मुख्य अभियंत्यांना थेट मुख्यमंञ्यांच्याच गावची जहागीरी दिली गेली.
या प्रकरणाची चर्चा थांबते ना थांबते तोच मनोरा आमदार निवास इमारतीचा घोळ आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या अथक प्रयत्नांनी चर्चेत आले.या प्रकरणात सर्व स्तरावर अपयश आल्यानंतर आ.वाघमारे यांनी मुख्यमंञ्यांकरवी चौकशी लावून चौकशीचा अहवालही तयार करवून घेतला.या अहवालात चौकशी अधिकारी असलेले अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी गैरव्यवहाराला तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले असतांना त्यांच्यावर जाणिवपुर्वक कारवाई टाळली गेली,यामागे साबां मंञ्यांची भुमिका निर्णायक ठरली.भ्रष्ट अभियंत्यांना मंञी पातळीवरून संरक्षण दिले जात असेल तर पारदर्शक कारभाराची अपेक्षा कशी धरता येईल,आधी मंञ्यांना पारदर्शक क ारभाराचे धडे देण्याची गरज आहे.अशा प्रतिक्रिया साबांतून व्यक्त केल्या जात आहेत.