Breaking News

श्रद्धा शहा यांचा स्तुत्य उपक्रम


पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी 
स्वप्न मोठी असावीत, माणसाचा परिचयाची सुरुवात जरी चेहर्‍याने होत असली तर, त्याची संपूर्ण ओळख विचार आणि कर्मानेच होते. जीवनात पैसा कधीही मिळवता येतो मात्र, निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही. सध्याच्या काळात बुद्धीवंताना मोठमोठ्या संधी चालुन येतात, त्यासाठी मन लावून आणि प्रामाणिकपणे शिक्षण पुर्ण करावे. यातुन मुलांनी प्रेरणा घेऊन पुढच्या वर्गात गेल्यानंतर चांगले गुण संपादन करावे अशी अशा उराशी बाळगुन अकोले तालुक्यातील खिरविरे येथील श्रद्धा दिनेश शहा या विद्यार्थीनीने इ. 10 वी बोर्ड परीक्षेत 87 टक्के गुण मिळविल्याने येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप करून समाजात एक आदर्श जपण्याचे कार्य केले आहे.
श्रद्धाने स्तुत्य उपक्रम राबवून खिरविरे येथील जिल्हा परिषद शाळेत इ. 1 लीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, दुसरीसाठी पेन्सील पाटी, 3 रीसाठी अंकलिपी तसेच इ. 4 थीसाठी कलर बुकचे वाटप केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय भांगरे, सहशिक्षक राजु काळे, वामन डगळे, पालक दिनेश शहा उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे सरपंच गीताबाई रावते, उपसरपंच सुनंदा आवारी, सदस्य पंढरीनाथ शांताराम बेणके, कांताबाई बेणके, त्रिंबक पराड, सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रकाश पराड, अमृत सागर दुध संघाचे संचालक सुभाष बेणके, पोलस पाटील हिरामण बेणके, मा. सरपंच गणपत डगळे, मा. उपसरपंच देवराम हाळकुंडे, विद्यालयाचे प्रा. अंतुराम सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.