Breaking News

विद्यालय परिसरात वृक्षारोपण


श्रीरामपूर 
वृक्ष आमचे मित्र तसेच पर्यावरणाची गरज यानुसार, प्रत्येक प्राणीमात्राचा श्‍वास असणार्‍या वृक्षारोपन लागवड करणे तसेच भविष्यात त्यांची जोपासना करण्याच्या गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका आर. ए. कुलकर्णी यांनी केले.
येथील प्रेमजी रतनसी पटेल हायस्कुलमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरात पर्यावरण उपयोगी वृक्षारोपांची लागवड केली. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर. ए. कुलकर्णी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पालक रावसाहेब बोरुडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी दिनेश तरटे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रोपांची लागवड केली. याप्रसंगी विद्यालयाचे अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.