Breaking News

ई-लर्निंगसाठी सी-डॅकने तयार केले डिजिटल बोर्ड

पुणे, दि. 19, मार्च - प्रगत संगणक विकास केंद्र अर्थात सी-डॅकने देशात उच्च शिक्षण घेणार्‍या संस्थांमध्ये ई-लर्निंगद्वारे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता येण्यासाठी तीन प्रकारचे डिजिटल बोर्ड तयार केले आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये हे बोर्ड बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी येथे दिली. सी-डॅकच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक ा येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी इ-लर्निंगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रणालींची रचना व प्रसाराला चालना (डिजिटल बोर्ड), ट्रान्समिशन ऑफ ऍग्रेगेटेड् डेटा फॉर रिअल टाइम ए ॅक्सेस (तारा), एसडीएन ऑनलाइन लॅब, ऑनलाइन इश्युयन्स ऑफ वुड बेस्ड् इंडस्ट्रीज लायसन्स फॉर फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा प्रॉडक्टचे अनावरण करण्यात आले. 
सी-डॅकच्या नोएडा केंद्राने डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग आणि एम्बेडेड सिस्टिम अशा तीन प्रकारचे डिजिटल बोर्ड उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. हे तीन बोर्ड सध्या बाजारपेठेत दोन ते पाच हजार रुपयात उपलब्ध होतील. या बोर्डवर विविध प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग, इंजिनिअरिंगमधील प्रात्यक्षिके, कठीण गणिते, क्लिष्ट संशोधन आरामात सोडविता येणार आहे. या बोर्डाद्वारे शिक्षण घेणे सोपे होण्यासाठी ई-लर्निंग वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.