स्वातीताई मोराळे यांचा शेवगांव मधील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद
शेवगांव /प्रतिनिधी
ओबीसी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांनी नुकतीच शेवगांव शहर तसेच तालुक्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. नागपूर येथे जात असताना त्यांनी शेवगावला धावती भेट दिली.त्यावेळी त्यांनी शेवगाव तालुक्यातील ओबीसी फाऊंडेशनच्या च्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली .त्यांनी शेवगाव येथील गोपीनाथराव मुंडे चौकामध्ये स्व. गोपीनाथ मुढें यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन केले. तसेच मुढें साहेबांनी आयुष्य संघर्षात घालवले त्यांनी केलेल्या संघर्षाला उजळा देत ओबीसी विद्यार्थ्यावर होत असलेल्या शैक्षणिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विधिमंडळात हा प्रश्न आमदार पंकजा मुंडे यांच्यामार्फत उपस्थित करणार असल्याचे सांगितले . तसेच इतर प्रश्नावरही त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर नंतर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील शिक्षकांना शाळेवरून काढण्यात आले, त्यांचा प्रश्नही हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न करू असे ही मोराळे पुढे म्हणाल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अक्षय केदार, उपाध्यक्ष नितीन खेडकर, ओबीसीचे जिल्हा सरचिटणीस गंगाभाऊ खेडकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुणभाऊ मुंडे , अशोक ढाकणे, अभय पालवे पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी उगलमुगले, सागर पाटील तसेच ओबीसी फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.