Breaking News

संगमनेर तालुक्यातील तीन तिर्थक्षेत्रांना क दर्जा

संगमनेर, दि. 22 - तालुक्यातील कासारा दुमाला, संगमनेर खुर्द व सायखिंडी येथील तिर्थक्षेत्र  असलेल्या यात्रास्थळांचा क दर्जात समावेश झाला आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सहकार, शिक्षण, कृषी, समाजकारण, वैचारिक चळवळ, समृध्द बाजारपेठ, दुग्ध व्यवसाय या सर्व क्षेत्रात  तालुक्याचा अग्रक्रम राहिला आहे. तालुक्यात गावोगावी, वाडी वस्तीवर, शिक्षण,संगमनेर तालुका आ. थोरात यांच्या दुरदृष्टीतून सातत्याने विकासाच्या योजना  राबविल्या जात आहे.  तालुक्यातील अनेक धार्मिक स्थळांचा पर्यटन विकास योजनाअंतर्गत विविध योजनांमध्ये समावेश करुन त्याचा विकास केला आहे.
संगमनेर तालुक्यातील हरि पुरुषोत्तम मंदिर कासारा दुमाला, अमृतेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्ट संगमनेर खुर्द व  खानेश्‍वर देवस्थान सायखिंडी यांचा नव्याने क दर्जाच्या  तिर्थस्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे या देवस्थानच्या जागेत भाविकांसाठी विविध सुविधा व या परिसराचे सुशोभिकरण केले जाणार आहे. या कामी  अजय फटांगरे, मिलींद कानवडे, रामहरी कातोरे, मेहेंद्र गोडगे, भाऊसाहेब कुटे, सिताराम राऊत, शांताबाई खैरे, मिराताई शेटे यांनीही जिल्हा परिषदकडे पाठपुरावा  केला. या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला, संगमनेर खुर्द व सायखिंडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.