Breaking News

कळंबच्या श्री चिंतामणीचे दर्शन घेवून राष्ट्रवादीच्या पदयात्रेला सुरुवात

यवतमाळ, दि. 03, डिसेंबर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारच्याविरोधात सुरु केलेल्या पदयात्रेच्या आजच्या तिसर्‍या दिवशी अष्टविनायकमधील कळंब येथील श्री चिंतामणी देवस्थानचे दर्शन घेवून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.


या पदयात्रेमध्ये पक्षाचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,ज्येष्ठ नेते जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी,महिला पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थित आहेत. तिसर्‍या दिवशी कळंबपासून या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेमध्ये शेतकरीवर्ग मोठया संख्येने सहभागी झाला आहे.