Breaking News

श्रीरामपूर येथे संयम स्वर्ण दीक्षा महोत्सवाचे आयोजन


श्रीरामपूर (प्रतिनिधी )  
येथील सकल जैन समाजाच्यावतीने परम पुज्य आचार्य श्री 108 संतशिरोमणी विद्यासागरजी महाराज यांच्या संयम स्वर्ण दीक्षा महोत्सवानिमित्ताने किर्ती स्तंभ शिलान्यास तसेच अक्षयसागरजी महाराज यांचे संसघ प्रवचन मंगळवार दि. 17 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्ताने रविवार दि. 15 जूलै रोजी सकाळी 8 वाजता भक्तामर पाठ, 9 वाजता पाठशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सामुहीक पुजन होणार आहे. त्यानंतर महाराजाचे आहारचर्या दुपारी 1 वाजता आचार्य छत्तीसी विधान होणार आहे. हे सर्व कार्यक्रम परम पुज्य अक्षयसागरजी महाराज , नेमीसागरजी महाराज समताभूषणजी महाराज यांच्या उपस्थित होणार आहे. सोमवार 16 जूलै रोजी दुपारी 12 वाजता भक्तामर विधान त्यांनतर दुपारी 3 वाजता पाठशाळाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सांयकाळी संगीतमय आरती होणार आहे. मंगळवार दि.17 जूलै रोजी सकाळी 7 वाजता पुजा व अभिषेक त्यांनतर श्री भक्तामर पाठ, दुपारी 1 वाजता मिरवणुक पाश्वनाथ दिंगबर जैन मंदिरापासुन निघणार आहे. या मिरवणुकीत आचार्य श्री विद्यासागर महाराजाच्या प्रतिमा घोडागाडी ठेवली जाणार आहे. मिरवणुक मेनरोड, शिवाजी रोड मार्ग भाजीमंडई मार्गे मेनरोडवरील आझाद मैदानावर समारोप होईल. या ठिकाणी किर्ती स्तंभ शिलान्यास होणार आहे. यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते व दातार श्रीमान हिराचंदजी कासलीवाल(श्रीरामपूर,औरंगाबाद) परिवाराच्यावतीने संपन्न होणार आहे. यास उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड याच्यासह नगरसेवक, नगरसेविका व सकल जैन समाज उपस्थित राहणार आहे. त्यानंतर जैनस्थानकात परम पुज्य अक्षयसागर महाराज यांचे प्रवचन होणार आहे. सायकाळी 5 ते 7 सकल जैन समाजासाठी महाप्रसादाचे आयोजन विर सेवा दलच्यावतीने करण्यात आले आहे. रात्री 7.30 वाजता आझाद मैदानावर महाआरती करण्यात येणार आहे. आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांची महाआरती संपुर्ण जगभरात एकाच वेळेस सांयकाळी 7.30 वाजता होणार आहे.
या सर्व कार्यक्रमास सकल जैन समाजाने उपस्थित रहावे असे अवाहन दिंगबर जैन समाज, स्थानकवासी जैन समाज व मंदिरमार्गी समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.