Breaking News

केंद्र सरकारने पाकला धडा शिकवायला पाहिजे - डॉ. तोगडिया

जळगाव, दि. 22 - भारत पाक सीमेवर पाकचे सैनिक भारताच्या सीमेत प्रवेश करुन आपल्याच सैनिकांचा शिरच्छेद करतात ही देशासाठी लाजिरवाणी बाब असून  त्यासाठी केंद्र सरकारने पाकला धडा शिकवायला पाहिजे, असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्या प्रशिक्षणाच्या समारोपाप्रसंगी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज, नीलेश सुरतवाला, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र मुंदडा, अनंतराव पांडे, दादा शिनगर, हरिजी करकरे आदी  उपस्थित होते.
पाकचे सैनिक भारताच्या सीमेत शिरुन आपल्याच देशाच्या दोन सैनिकांचे शिरच्छेद करुन त्यांच्या मृतदेहाची अवहेलना करतात. तरीही त्या पाकला धडा शिकवला  जात नसेल तर ही भारतासाठी लाजिरवाणी बाब आहे. तरी केंद्र सरकारने यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही हे न समजणारे कोडे आहे. तरी देशाने पुन्हा  काश्मीरवर विचार करायला पाहिजे. कारण काश्मीरवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असून यासाठी केंद्र शासनाने ठोस पाऊले उचलून सक्षम अधिकार्यांची नियुक्ती करुन  त्यास सर्व अधिकार दिल्यास एका दिवसात श्रीनगरातील परिस्थिती व आतंकवाद नष्ट करु शकतात, असे अधिकारी या देशात आहेत. यासाठी देशातील सर्वच  राजकीय पक्षांनी आपआपले दल सोडून एकत्र आल्यास भारताकडे वाकड्या नजरेने पाहणेही पाकला शक्य होणार नाही; पण राजकीय पक्षातील मतभेद व वोटर बँक  हिच खरी चिंता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.