Breaking News

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध ; पृथ्वीराज देशमुख यांची माघार


मुंबई : विधानपरिषद निवडणूकीत भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपची उमेदवारी न घेता रासपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 16 जुलैला निवडणूक होणार होती. 11 जागांसाठी भाजपाचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी 12 वा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूकीची रंगत वाढली होती. मात्र आज भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिन विरोध झाली आहे.रासपाचे उमेदवार आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, भाजपाचे विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक, शिवसेनेचे अ‍ॅड. अनिल परब, मनिषा कायंदे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता सत्ताधारी भाजप विधानपरिषदेमध्ये सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. भाजपचं विधानपरिषदेतलं संख्याबळ 21 झालं आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ 17 आमदारांपर्यंत घटले आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांची संख्या समान झाली आहे. 2014 सत्तेत आल्यानंतर म्हणजेच साडेतीन वर्षांनी भाजपा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. तत्पूर्वी आज सकाळी भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता 11 जागांसाठी केवळ 11 उमेदवारच मैदानात उरले. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे 11 जागांसाठी उमेदवारांची संख्या 12 झाली होती. त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यातच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा पाहता निवडणूक चुरशीची झाली असती. मात्र, देशमुख यांनी अर्ज मागे घेतला आणि ही चुरस ट


विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल
भाजपा- 21
राष्ट्रवादी काँग्रेस -17
काँग्रेस-17
शिवसेना- 12
जदयू- 1
आरपीआय कवाडे गट-1
शेकाप-1
रासप-1
अपक्ष-1
रिक्त-1