Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांना नोकरी


प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना लुपिन फार्मास्युटिकल या कंपनीत नोकरी मिळाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी दिली.

या महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या लुपिन फार्मास्युटिकल या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीद्वारे धीरज शिरूरे, दीपक नलावडे, शुभम मानकर, अक्षय यादव आणि ऋतुजा पाचोरे या विद्यार्थ्यांची लुपिन कंपनीच्या तारापूर येथील शाखेसाठी क्वालिटी कंट्रोल या विभागात निवड केली आहे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख एम. एच. कोल्हे व त्यांचे सहकारी टी. पी. डुक्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, युवा नेते डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक हरिभाऊ आहेर आदींनी कौतुक केले.