सरबजीत सिंह यांची बहीण दलबीर कौर यांचा भाजपमध्ये प्रवेश
फाजिल्का (पंजाब), दि. 26 - सरबजीत सिंह यांची बहीण दलबीर कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सरबजीत यांचा 2013 साली पाकिस्तानातील तुरुंगात मृत्यू झाला. त्यांच्या बहिणीने आता भाजपमधून राजकारणात पाऊल ठेवलं आहे. पजाब भाजपच्या किसान मोर्चाचे महासचिव गुरविंदर सिंह यांच्या माहितीनुसार, दलबीर कौर यांनी मंत्री सुरजीत ज्ञानी यांच्या उपस्थितीत किसान मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सरबजीत सिंह यांना पाकिस्तानातील तुरुंगातून सोडवण्यासाठी दलबीर कौर ज्यावेळी संघर्ष करत होत्या, त्यावेळी त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यावेळी त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चाही होत होत्या.
एप्रिल 2013 मध्ये लाहोरमध्ये कैद्यांच्या हल्ल्यात सरबजीत सिंह यांचा मृत्यू झाला. सरबजीत यांना पाकिस्तानातील एका कोर्टाने दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणून दोषी ठरवलं होतं. 1991 साली सरबजीत यांना मृत्युदंडाशी शिक्षाही पाकिस्तानातील कोर्टाने सुनावली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारने 2008 मध्ये सरबजीत यांची फाशी अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. दरम्यान, दलबीर कौर यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हजेरी लावणार होते. मात्र, खराब वातावरणामुळे राजनाथ सिंह किसान मोर्चाच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.