Breaking News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याच्या मुलीची आत्महत्या

लातूर, दि. 15 - कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून उद्विग्नतेतून शेतकर्‍यांच्या मुलांनाही जिवन संपवण्याची वेळ आली आहे. लातूर जिल्ह्यातील एका 21 वर्षीय मुलीने लग्नासाठी कर्ज मिळत नसल्याने आणि घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील शीतल व्यंकट वायाळ या 21 वर्षीय मुलीने सततची नापिकी, हालाखीची आर्थिक परिस्थिती आणि लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे आज सकाळी 8 वाजता कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शीतलने आत्महत्येपूर्वी पत्रात आत्महत्या केलेल्या कारणांचा उल्लेख केला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्यावर्षीही भिसेवाघोली येथील मोहिनी भिसे या शेतकर्‍याच्या मुलीनेही याच कारणासाठी आत्महत्या केली होती.
मी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. वडिलांना माझ्या लग्नासाठी कुणीही कर्ज देण्यास तयार नाही, माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरु नये, असं शीतलने पत्रात म्हटलं आहे.