Breaking News

दिल्ली निवडणुकीत शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने तिसर्‍यांदा झेंडा रोवला, तर ‘आप’ आणि काँग्रेसचं पानिपत झालं. दिल्लीचे तख्त राखण्यासाठी रिंगणात उतरलेल्या शिवसेनेलाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
दिल्ली महापालिकेच्या आखाड्यात 2 हजार 516 उमेदवार उतरले होते. यापैकी जवळपास 70 टक्के म्हणजे 1 हजार 790 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. यामध्ये आपच्या 40, तर काँग्रेसच्या 92 उमेदवारांचा समावेश आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपच्या 5 जणांचा समावेश आहे. रिंगणात उतरलेल्या बसपच्या 192, जदयूच्या 94, तर शिवसेनेच्या 55 उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली आहे.
2012 मधील दिल्ली महापालिका निवडणुकीतही 1 हजार 782 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं, अशी माहिती दिल्लीचे निवडणूक आयुक्त एस के श्रीवास्तव यांनी दिली.