पारनेर नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ
सुपा / प्रतिनिधी ।
पारनेर नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे तसेच नगरसेवक यांनी काल नगरपंचायत कार्यालयात बहुजन समाजाचे अराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदग्रहण करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत चेडे, राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती गंगाराम बेलकर, नगरसेविका विजेता सोबले, मालन शिंदे, शशिकला शेरकर, संगिता औटी, नंदकुमार औटी, विशाल शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी सचिन नगरे, सुभाष औटी, बबन चौरे, सुधाकर नगरे, बाळासाहेब मते, आदिंनी शुभेच्छा दिल्या. ऩवनिर्वाचित उपनगराध्यक्ष चेडे म्हणाले की, नगरपंचायतमध्ये सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य दिले जाईल. नागरीकांच्या प्राथमिक समस्या जाणुन घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरातील ज्वलंत पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रामुख्याने प्राधान्य दिले जाईल. मिळालेल्या संधीचे सोने करुन अडीच वर्षात शहराचा कायापालट करण्यात येईल. नगराध्यक्षा वर्षा नगरे म्हणाल्या की, सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून नगरपंचायतमध्ये काम केले जाईल. सर्व सामान्य नागरिकांच्या समस्येला न्याय देण्याचे काम करण्यात येईल. शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रशासन व नगरसेवक यांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल. सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सर्वपक्षियांनी नगरपंचायतमध्ये परिवर्तन करण्यास मदत केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन भालेकर यांनी, तर आभार माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे यांनी मानले.