Breaking News

साहीत्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव


परभणी प्रतिनिधी, दि. 01 -  शनिवार बाजार येथील शासकिय विश्रामगृहामध्ये साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक उत्सव समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मातंग समाजाचे युवानेते गुरू सावळे यांची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली. या वेळी त्यांचा बबनराव नेटके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बबनराव नेटके अखिल भारतीय मातंग संघाचे जिल्हाध्यक्ष, धोंडीरामजी कदम, भिमराव वायवळ, लहुजी साळवे, बहुजन क्रांती सेनेचे युवा नेते शिवाजी शेळके, संजय घुले सामाजिक कार्यकर्ते दत्तराव साळवे, मुकुंद भालेराव, निवृत्ती नितनवरे, मारोती कदम, रवि नेटके, एल.डी. कदम राजु कर्डीले, अनिल सावळे, शिवाजी नेटके, राजेश काळे, रोहित परसोडे उपस्थित होते.