Breaking News

पद्मशाली समाज युवक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

अहमदनगर, दि. 29 - पद्मशाली समाज हा नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. व हा समाज गरीब असल्याने अनेक मुले -मुली शिक्षणांपासून वंचीत राहत आहेत. समाजातील अनेक तरुणांनी एकत्र येवुन पद्मशाली समाज युवक संघटना स्थापन  केली. आणि  या माध्यमातुन समाजातील एकही  विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही. यासाठी संघटनेच्या माध्यमातून  विविध शैक्षणिक उपक्रम राबवित आहोत, असे सुमित इप्पलपेल्ली यांनी सांगितले. 
पद्मशाली समाज युवक संघटेच्या वतीने तोफखाना, दातरंगे मळा, श्रमिकनगर, नित्यसेवा,पद्मानगर, शिवाजीनगर, पाईपलाईन हडको, चितळे रोड, गौरी घुमट, मार्कंडेय मंदिर या परिसरातील गोर-गरीब व गरजु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमित इप्पलपेल्ली, अजय म्याना, रवि दंडी, श्रीकांत येनगुपटला, कैलास शेरला, विकी इप्पलपेल्ली, शुभम बुरा, सतिष चिंता, अक्षय वल्लाकट्टी, राकेश गालपेल्ली, सागर बोगा, शंकर जिंदम, विनायक बोगा, सागर रंगा, राजु म्याना, राहुल म्याना, किरण कोडम, नानु इगे आदी उपस्थित होते.
यावेळी अजय म्याना म्हणाले कि, संघटनेच्या माध्यमातुन समाज एकत्र करुन समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे काम करणार आहोत. आणि समाजातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  यावेळी गोर - गरीब विद्यार्थ्यांना 2000 वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजातील विविध  क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती व समाजाबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम बुरा यांनी केले. तर आभार कैलास शेरला यांनी मानले.