बहिरवाडीसह मेहेंदुरीत शेतकर्यांनी दुध ओतून केला निषेध
मेहेंदुरी / प्रतिनिधी । 18 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढ आंदोलनास अकोले तालुक्यातील बहिरवाडी व मेहेंदुरी येथील शेतकर्यांनी सकाळी 6 वाजता ओम साई डेअरीची गाडी थांबवत दुधाचे कॅन ओतून दिले. तर मेहेंदुरी येथील प्रभात दूध संकलन केंद्र बंद करून या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला. दुधाला किमान 30 रुपये बाजार मिळायला पाहिजे. यासाठी सकाळी गावातील शेतकर्यांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त करत या आंदोलनास पाठिंबा दिला. या वेळी हरि आरोटे, सुनील चासकर यांनी दुधाच्या विषयावर सरकार उदासीन असून जर, दुधाला बाजारभाव वाढवून न दिल्यास, आंदोलन अजून पेटेल व सरकारला या आंदोलनास सामोरे जावे लागेल. परंतु सरकार दुधालादेखील बाजारभाव देत नसेल तर, शेतकर्यांना आत्महत्या शिवाय पर्याय नाही. सरकारला याची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाही. बहिरवाडीमध्ये सर्व शेतकर्यांनी ओम साई डेअरीच्या गाडी मधील 200 लिटर दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी सुनील चासकर, सुधाकर वावळे, खंडू पाडेकर, चंद्रभान वाजे, हरिभाऊ आरोटे, भाऊसाहेब पाडेकर, सुधाकर चासकर, योगेश चासकर, मनोज वावळे, सागर आरोटे, विकास बंगाळ, साहेबराव आरोटे, सुभाष येवले, भरत नवले आदी शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाला पाठिंबा दिला.
घामाचे दाम हवे असेल तर, निर्णय होईपर्यंत थांबा, सरकार शेतकर्यांशी चर्चा करायला तयार नसून, शेतकर्यांनी घाई न करता, दूध देऊ नका. शेतकर्यांनी संघर्ष केल्याशिवाय 27 रु 28 रु बाजार मिळणार नाही. छुप्या मार्गाने दूध संकलन केंद्राला घालू नका. तेंव्हाच घामाचे दाम मिळेल. ज्या लोकांना दूध घालायचे आहे, त्यांना विनंती आहे. आम्हाला त्रास देऊ नका, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, आम्हाला सरकारला त्रास द्यायचा आहे.
अशोकराव आरोटे, शेतकरी संघटनेचे नेते अ. स. सा. का. संचालक
2 दिवसापासून दुधाचे आंदोलन सुरू असून, दूध उत्पादकांना विनंती आहे, दूध संकलन केंद्राला देऊ नका. अकोले तालुका व नगर जिल्ह्याने दूध बंद ठेवलेले असून, 2 ते 3 दिवस थांबा तर आपले मोल आपल्याला मिळेल. तोट्यात दूध देऊन स्वतःचे नुकसान करू नका. निसर्गाचा कोप झाला तर, लाखो रुपये खर्च करतात, 2 ते 3 दिवस दूध घातले नाही तर, फारसे नुकसान होणार नाही.
चंद्रकांत नेहे, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना