भातसा नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू
टिटवाळा : खडवली येथील भातसा नदी किनारी ओझरली गावात सहलीसाठी आलेल्या तिघा तरुणांचा भातसा नदीत बूडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ही दुद र्ैवी घटना घडली. बुडालेले तिघेही ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारे असून त्यांची नावे रोशन कामत (वय 30 वर्ष), सुरज उदय सिंह (वय 30वर्ष), राजेश शेरसिंग रयटा (वय 35 वर्ष) अशी आहेत. या घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस व कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेतला. मात्र अथक प्रयत्न करूनही मृतदेह हाती लागले नाहीत. तसेच अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी सकाळी शोध घेतला. त्यावेळी तिघांचेही मृतदेह आढळून आले.