Breaking News

सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल वैद्य यांचा गौरव


राहाता / प्रतिनिधी
देशभर पसरलेला शिंपी समाज संघटीत करण्यासाठी, आपण सदैव कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा नामदेव समाजोन्नती परीषदेचे अध्यक्ष बापुसाहेब वैद्य यांनी केले.
राहाता येथील संत नामदेव शिंपी समाजाचे कार्यकर्ते व अहमदनगर जिल्हा नामदेव समाजोन्नती परीषदेचे अध्यक्ष यांच्या समाजसेवेची दखल घेवुन सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश नामदेव समाजोन्नती परीषदेच्या वतीने परीषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या हस्ते वैद्य यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास परीषदेचे उपाध्यक्ष संजीव तुपसाखरे, रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे व नुकतेच आय.ए.एस. परीक्षेत विशेष यश संपादन करणारे संत नामदेव शिंपी समाजातील पहिले आय.ए.एस. अधिकारी सुरज गणोरे, सीआयडी अधिकारी चांडोले तसेच परीषदेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
तसेच 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा व क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या खेळाडुंचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कर्जत तालुकाध्यक्ष राजेंद्र बारटक्के, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर लचके, नेवासा
तालुकाध्यक्ष अमोल पतंगे, कोपरगांव तालुकाध्यक्ष रमेश झांबेर, राहाता तालुकाध्यक्ष सुनिल देव्हारे व शिंपी बांधव-भगिणी उपस्थित होते.