Breaking News

पालघरमध्ये शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या जागेसाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे पालघर जिह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांनी मंगळवारी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. वनगा कुटूंबीयांना पक्षात प्रवेश देऊन या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही ही  निवडणूक राजकीय फायद्यासाठी लढवत नाही. तर भावनिकतेतून लढत आहोत. तसेच वनगांच्या कुटूंबीयांना काही अनुभव आल्यामुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर या निवडणुकीसाठी आम्ही वनगांच्या कुटूंबातील सदस्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चिंतामन वनगा यांचे चिंरजीव श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.