Breaking News

डॉ. सादिक राजे यांना सह्याद्री रत्न पुरस्कार


पारनेर / प्रतिनिधी
आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल, शहरातील आनंद मेडिकल फाऊंडेशन संस्थेचे सचिव डॉ. सादिक राजे यांना सह्याद्री परिवारच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.पारनेर येथील आनंद मेडिकल फाऊंडेशनचे सचिव डॉ. सादिक राजे यांनी पारनेर तालुक्यासह राज्यात आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. विविध आरोग्य शिबीरे, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, दत्तक मुले योजना यासह अनेक उपक्रम राबविले आहेत. डॉ. सादिक राजे यांना त्यांच्या कार्याबद्दल दिल्ली येथील भारतीय मानव संसाधन संस्थेचा बेस्ट एज्युकेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शुक्रवारी नगर येथे पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर, विनायक मेटे यांच्या हस्ते सह्याद्री रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी खा. दिलीप गांधी, संजय कळमकर, संदीप थोरात, परवीन राजे, राजू फकीर, फहाद राजे, मेहविष राजे, दानिश राजे, फजल फकीर, प्रशांत औटी आदी उपस्थित होते.