फुलेनगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
पाथर्डी : नगरसेवक प्रसाद आव्हाड यांच्या प्रभागातील फुलेनगर येथील सार्वजनिक भूखंड सुशोभीकरणासह इतर एक कोटी रपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, पांडुरंग खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक प्रसाद आव्हाड, रमेश गोरे, दुर्गा भगत, नामदेव लबडे, प्रवीण राजगुरू, संगीता गटानी, दिपाली बंग, नंदुशेठ शेळके आदी नगरसेवक उपस्थित होते.