पुणतांब्यात एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या
राहाता तालुक्यातील पुणतांब्यात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडली, तर एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या झाल्यामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण असून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.. स्टेशन रस्त्यावरील विजय किराणा स्टोअर्सचे दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील काजू, बदाम, किराणा मालावर डल्ला मारला.