भैरवनाथ देवस्थान पायी दिंडीचे स्वागत
पाथर्डी : अमरापूर येथील भैरवनाथ देवस्थान पायी दिंडीचे पाथर्डी शहरात स्व.राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दिंडी सोहळ्याचे प्रमुख काकासाहेब मुखेकर महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, नगरसेवक रमेश गोरे, नामदेव लबडे, प्रसाद आव्हाड, अनिल बोरुडे, प्रवीण राजगुरू, नितीन गटानी, रामकिसन लबडे, राधाकिसन लबडे, बाळासाहेब लबडे, शंकरराव लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.