Breaking News

’मेट्रो-3 साठी त्वरित जागा हस्तांतरित करा’

मुख्यमंत्र्यांचे पालिकेला आदेश

मुंबई, दि. 13 -  मुंबई मेट्रो-3 साठी आवश्यक जागा त्वरित हस्तांतरीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला भाजपानं धक्का दिल्याची चर्चा सुरु आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा 33 किलोमीटरचा हा मुंबईतला पहिलाच भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पामुळे गिरगाव, दादर भागातील लोक विस्थापित होतील आणि कारशेडमुळे आरे कॉलनीतल्या झाडांची हानी होईल असा दावा शिवसेनेचा आहे.
मुंबई महापालिकेत बहुमताच्या जोरावर सेनेनं या प्रकल्पाविरोधात ठराव आणला. मात्र, हा ठराव रद्द करत तातडीनं प्रकल्पाला जमीन द्या, असे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत. 2019 पर्यंत ही मेट्रो सुरु करण्याचा भाजपचा मानस आहे. मेट्रोसाठी 17 भूखंड तात्पुरत्या स्वरूपात, तर 24 भूखंड कायम स्वरूपात मेट्रो कार्पोरेशनला हस्तांतरीत करावेत असे आदेशच नगरविकास विभागाने सोमवारी महापालिकेस दिले.