Breaking News

वैतरणेचे 12 टीएमसी पाणी गोदावरीमध्ये वळविण्याची मागणी


औरंगाबाद, दि. 28-जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील वरच्या भागातील धरणांची क्षमता जास्त असल्याने जायकवाडी धरणाचे सिंचन क्षेत्र सव्वा लाख हेक्टरने कमी झाले आहे. त्यामुळे वैतरणेचे जादा पाणी गोदावरीत सोडावे अशी मागणी जलतज्ज्ञ शंकरराव नागरे, कृषीतज्ज्ञ भगवानराव कापसे व एनजीओचे बडजाते यांनी केली होती. त्यानुसार राज्यपालांशीही चर्चा करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर या विषयात आता प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी या मागणीच्या संदर्भात जलतज्ज्ञांची भेट घेवून चर्चा केली. सध्या जायकवाडी धरणात पाणलोटक्षेत्रातून अपेक्षेपेक्षा 35 टीएमसी पाणी कमी येत आहे. त्यामुळे वैतरणेचे जास्तीचे पाणी जायकवाडीत वळवावे अशी मागणी करण्यात आली आहे.