गंभीर गुन्ह्यातील आरोपी सहा महिण्यांसाठी तालुक्यातून तडीपार
श्रीगोंदा / प्रतिनिधी । 18 - तालुक्यातील काष्टी येथील रहिवाशी असणारा व विविध प्रकारचे अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपी असणारा सुभाष कोंडीबा चौधरी याला सहा महिन्यांसाठी श्रीगोंदा तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले असून, याबाबत श्रीगोंदा पारनेरचे प्रांत अधिकारी गोविंद दाणेज यांनी या तडीपारीबाबत आदेश पारित केला आहे. दरम्यान श्रीगोंदा पोलीस स्टेशन अंतर्गत झालेली तडीपारीची ही पहिलीच कारवाई असून, या कारवाईमुळे श्रीगोंदा पो. निरीक्षक बाजीराव पोवार यांनी ज्या गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सुभाष कोंडीबा चौधरी रा. चौधरी मळा, काष्टी ता. श्रीगोंदा याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगणे, दंगल माजवणे, गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे यासारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे चौधरी याची काष्टी गावात चांगलीच दहशत पसरली होती. त्यामुळे श्रीगोंदा पो. नि. बाजीराव पोवार यांनी चौधरी यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावावर अंतिम सुनावणी होऊन नुकताच श्रीगोंदा पारनेरचे प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांनी चौधरी याची श्रीगोंदा तालुका हद्दीतून तडीपारीचा आदेश पारित केला असून, चौधरी याने पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी श्रीगोंदा तालुका हद्दीतून निघून जावे तसेच, तडीपारीच्या काळात चौधरी ज्या भागात राहतील तिथल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन महिन्यातून एकदा हजेरी लावण्याबाबतदेखील या आदेशात सांगितले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पहिलीच तडीपारीची कारवाई
मागील काळात आत्तापर्यंत श्रीगोंदा तालुक्यातून अनेक गुन्हेगारांच्या तडीपारीबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते मात्र, त्यावर पुढे काहीच कारवाई झाली नव्हती. परंतु श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सदरचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर केलेल्या पाठपुराव्यामुळे तो मंजूर झाला असून, अशाप्रकारे आरोपी तडीपार होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल.