Breaking News

निर्भया प्रकरणी ‘क्रूर’कर्म्यांना फाशीच; पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा होणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरील पुन र्विचार याचिका न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. चौघा दोषींपैकी तिघा जणांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी पार पडली. 16 डिसेंबर 2012 ला दिल्लीत झालेल्या या अमानूष बलात्काराने अवघा देश हादरला होता. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने झाली होती. या प्रकरणात एकूण सहा आरोपी होते. त्यापैकी आरोपी राम सिंह याने आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन होता. बाल सुधारगृहात 3 वर्षाच्या शिक्षेनंतर त्याची सुटका झाली होती. मुकेश (वय-29वर्षे ), पवन गुप्ता (वय-22वर्षे) आणि विनय शर्मा (वय-23वर्षे) या तिघांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात दोषी असणारा चौथा आरोपी अक्षय सिंह (वय-31वर्षे) याने पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही. निर्भया प्रकरणात सत्र न्यायालयाने तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. 
सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 च्या निकालानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2012 रोजी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी 23 वर्षीय वैद्यक ीय विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या आरोपींमधील राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तो किशोरवयीन होता. त्याला किशोर न्यायमंडळाकडून दोषी ठरविण्यात आले होते. 3 वर्षांसाठी त्याला सुधार गृहातही ठेवण्यात आले होते.

न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास दृढ झाला...
सर्वोच्च न्यायालयाने निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्भयाच्या पालकांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आजच्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास दृढ झाल्याचे निर्भयाची आई आशा देवी यांनी म्हटले आहे. 16 डिसेंबर 2012 ला दिल्लीत झालेल्या या अमानूष बलात्काराने अवघा देश हादरला होता. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने झाली होती. या प्रकरणात एकूण सहा आरोपी होते. त्यापैकी आरोपी राम सिंह याने आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन होता. बाल सुधारगृहात 3 वर्षाच्या शिक्षेनंतर त्याची सुटका झाली होती.