Breaking News

गंगा नदीत सहा जण बुडाले; तिघांचा मृत्यू


कानपूर - गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर तीन मुले बेपत्ता झाली आहेत. ही घटना कानपूर जिल्ह्यातील बाबुपुरवा भागात घडली आहे. ही सर्व मुले 12 ते 15 वयोगटातील होती. कोलोनगंजचे प्रशासकीय अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितले की, सहा मुले ही गंगा नदीत बुडाली होती. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित तिघांचा शोध घेण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार एक मुलगा नदीत बुडत असता इतर मुलांनी त्याला वाच विण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर तेही मित्राला वाचविताना नदीत बुडाले. पाण्यातून बाहेर काढलेल्या तिघांना जवळील लाला लजपत राय रुग्णालयात नेल्यानंतर डा ॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.