Breaking News

रॉबर्ट वडेरा यांच्या आईसह 13 जणांची सुरक्षा काढून घेतली

नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली पोलिसांनी रॉबर्ट वडेरा यांच्या आईसह एकूण 13 जणांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. वडेरा यांची आई मौरीन  वडेरा यांना 6 पोलीस अधिका-यांचे सुरक्षा कडे आहे. मौरीन वडेरा , केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक आलोक कुमार वर्मा, दक्षिण दिल्ली विभागाच्या विशेष सेलचे  पोलीस अधिकारी मनीषी चंद्रा, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि आम आदमी पक्षाचे एक मंत्री यांसह एकूण 13 जणांची सुरक्षा दिल्ली पोलीस काढून घेणार आहेत. मौरीन  यांना सुरक्षा पुरवण्याबाबत प्रसारमाध्यमांमधून प्रश्‍न उपस्थित केले जात होते. त्यानंतर, सुरक्षा पुरवणे ही सुरक्षा संस्थांची जबाबदारी आहे आणि ते हवे त्या वेळी सुरक्षा  काढून घेऊ शकतात, असे ट्विट रॉबर्ट वाड्रा यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.