Breaking News

प्रामाणिकपणे केलेल्या कर्तव्यपूर्तीमुळे समाधान : न्या. हश्मी

जामखेड / ता. प्रतिनिधी 
प्रामाणिकपणे केलेल्या कर्तव्यपूर्तीमुळे मनाला समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन जामखेड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश हश्मी यांनी केले. सहाय्यक अधिक्षक अनिल कुलकर्णी यांच्या नुकत्याच झालेल्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कुलकर्णी यांचा शासकीय सेवेतील पारदर्शकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे या कार्यक्रमास मोठ्या समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी कुलकर्णी यांचा तालुका वकील संघ व सर्व न्यायालयीन कर्मचारी यांच्यावतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. आपल्या एकूण 32 वर्षांच्या सेवेतील जास्तीत जास्त कालावधी जामखेड येथे व्यतीत झाल्यामुळे जामखेडकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील, असे भावोद्गार त्यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. न्या. हश्मी व न्या. सपकाळ यांच्यासह तालुका वकील संघाचे अ‍ॅड. नागरगोजे, राऊत, पारे, कात्रजकर, डोके, बारवकर, पवार, पाटील, काशिद, काळे, शेख तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोराडे व लघुलेखक पाटील यांची यावेळी मनोगते झाली. प्रज्ञा जोशी यांनी सहाय्यक अधिक्षक कुलकर्णी यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला, तर आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी नुकतेच जामखेडहून श्रीवर्धन येथे बदली झालेले दिवाणी न्यायाधीश ए. एम. मुजावर यांच्या शुभेच्छा संदेशाचे ओघवत्या शैलीत वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपूर्वा कुलकर्णी, सूत्रसंचालन कविता कुलकर्णी तर आभार अक्षय कुलकर्णी यांनी मानले. जामखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. घुमरे यांच्यासह अनेक सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, आप्तेष्ट व हितचिंतक यांची मोठी उपस्थिती होती.

कृषी विभागाने निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधले नसते तर, आमची हिरवीगार शेतजमीन आज उजाड झाली नसती. शासनाचे अधिकारी पंचनामे करून गेलेत, मग आम्हाला नुकसान भरपाई का मिळत नाही? शासनाने वास्तवस्थिती पाहण्यासाठी आज ही शेतात यावे, गाडलेली विहीर, नापीक झालेली जमीन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. मला जर न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसांत मी आत्मदहन करणार आहे.
सुभाष आवारी ( नुकसानग्रस्त शेतकरी)