Breaking News

रोडलगतच्या झाडांची होतेय होरपळ; संबंधित खात्याचे दुर्लक्ष


भाविनिमगाव :  अनेकांकडून स्वच्छतेच्या कारणास्तव रोडलगतच्या जागेवर ( खदानित) कचरा जाळून टाकला जातोय मात्र, या जाळपोळीत रोडलगतची चांगली छोटी मोठी झाडे मात्र यामुळे होरपळली जात असुन ती झाडे वाळून जात असल्याचेअनेक रोडवर दिसत असुन यात शासनाने लावलेली व आपोआप उगवलेली झाडे नष्ट होऊन त्यांचे सरपन होतअसल्याचे दिसत आहे. 

पर्यावरणाच्या दृष्टीने हा जाळपोळीचा प्रयोग झाडांना धोकादायक ठरत असुन भर उन्हाळ्यात तग धरून उभी असलेली झाडे अशाप्रकारे होरपळून नष्ट होत आहे. याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होतअसुन संबंधित खात्याच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असल्याचे दिसत असुन रोडलगतचा शेतकरीही या घटनेला जबाबदार असुन स्वच्छतेच्या नावाखाली अशा प्रकारे झाडांची एकप्रकारे तोडच होत असुन पर्यावरण घातक कृत्य या प्रकारामुळे घडत आहे. अशा प्रकारच्या घटनेला कोणीही आक्षेप घेत नाही. मोठा गाजावाजा करून दरवर्षी शासन झाडे लावते मात्र पुढील देखभाली अभावी ती झाडे अनेक ठिकाणी खड्यातच कोमेजून जातात जी जगतात तीही काही अशा जाळपोळ प्रकारे नष्ट होत असुन याकडे शासनाचे पुर्णतहा दुर्लक्ष असुन स्थानिक ग्रामपंचायतीही या झाडांचे काही देणे घेणे नसुन ते फक्त जुन महीन्यात झाडे लावा झाडे जगवा असे म्हणत योजना राबवते व त्या झाडामागच्या संगोपनाचा मलिदा खान्यातच धन्यता मानुन आपले काम झाले या अविर्भावात वागते. झाडे जगो न जगो याकडे ग्रामपंचायतचे लक्ष नसतेच तर संबंधित खात्याचेही दुर्लक्ष होत राहिल्याने अनेक ठिकाणी चांगली मोठी झालेली उन्हाळ्यात वाचलेल्या झाडांवर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संक्रांत येत आहे.

स्वच्छतेच्या कारणास्तव कचरा पेटवला जातो मात्र यात निरपराध व पर्यावरण पुरक झाडे कळत नकळत नष्ट होतायेत याकडे नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे व पर्यावरण संवर्धन होण्यासाठी हातभार लावून उगवलेली झाडे वाढवली पाहिजे त्यांची अशी होरपळ होता कामा नये.