‘संजीवनी ज्येष्ठ एकता’चे कार्य प्रेरणादायी : आ. वाणी.
चांदा : ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी चालविलेली प्रेम आणि आदर देण्याची चळवळ ही खरोखरच गरजेची आहे. आयुष्याच्या संध्याकाळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हा ग्रुप स्थापन केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून या वयातील व्यक्तींना दिलासा देण्याचे कार्य हाती घेतले, ते खरोखरेच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन वैजापूरचे माजी आ. आर. एम. वाणी यांनी केले.
येथील ज्येष्ठ नागरिक एकता ग्रुपच्या कार्यकर्माप्रसंगी ते बोलत होते. या ग्रुपच्या सदस्या भागिरथी शिंदे यांनी अधिक मासचे औचित्य साधून सर्वांना धोंड्याच्या स्नेहभोजनाचे नियोजन आणि विचारविनिमय बैठकीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत रामराव नवले होते. यावेळी प्रशांत बनसोड यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. डॉ, गोपाळघरे, जि. प. सदस्या सविता अडसुरे, पं. स. सदस्या पार्वती जावळे, मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजीराव दहातोंडे, कारभारी जावळे, अनिल अडसुरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, विधिज्ञ योगेश दहातोंडे, चांदा सोसायटी अध्यक्ष माधवराव दहातोंडे, डॉ. विनोद गुंदेचा, प्रकाश काटारिया, शिवाजी दहातोंडे, भाऊराव थिटे आदींसह संजीवनी जेष्ठ नागरिक एकता ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे एन. टी. शिंदे आणि लोखंडे परिवाराने विशेष सहकार्य केले. प्रास्तविक कोरडे यांनी केले. कारभारी जावळे यांनी आभार केले.