पारनेर बाजार समितीत वृक्षारोपण
पारनेर / प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पर्यावरण सप्ताहनिमित्त मुख्य बाजार आवार परिसरात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड़ व उपसभापती विलास झावरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गायकवाड़ म्हणाले की, वृक्ष मानवी जीवन चक्राचा अविभाज्य घटक असुन, बेसुमार वृक्ष तोडीमुळे निर्माण झालेला निसर्गातील असमतोल दूर करण्यासाठी, प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. वृक्षाचे संवर्धन करावे, त्यामुळे दुष्काळ हटविण्यास मदत होईल. या प्रसंगी उपसभापती विलास झावरे, संचालक अशोक कटारीया, गंगाराम बेलकर, अ़रूण ठाणगे, अण्णासाहेब बढे, शिवाजी बेलकर, काशीनाथ दाते, युवराज पाटील, विजय पवार, राहुल जाधव, वसंत चेडे, संभाजी आमले, सावकार बुचुडे, हर्षल भंडारी, खंडु भाईक, मिराबाई वरखडे, सोपान कावरे, दादा शिंदे, संगिता कावरे, व्यापारी अध्यक्ष मारुती रेपाळे, व्यापारी वर्ग, हमाल, मापाडी, कर्मचारी वर्ग, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.