बेल्जियमचा 'गेम ओव्हर'; फ्रान्स 'अंतिम फेरीत'
सेंट पीटर्सबर्ग वृत्तसंस्था
फिफा विश्वचषक २०१८च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात फ्रान्सनं बेल्जियमला १-० ने नमवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. फ्रान्सचा संघ गेल्या २० वर्षांमध्ये तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात पोहोचला आहे. बेल्जीयम संघाला एकही गोल करण्याची संधी फ्रान्सने दिली नाही.
सामन्याचा पूर्वार्ध हा गोलशून्य बरोबरीत सुटला. सामन्याच्या तिसऱ्या आणि १३व्या मिनिटाला फ्रान्सला गोलची संधी मिळाली, पण त्यांना चेंडू गोलपोस्टवर मारताच आला नाही. अखेर सामन्याच्या १९व्या मिनिटाला बेल्जियमकडून पहिला प्रयत्न झाला, पण फ्रान्सच्या बचावपटूने तो प्रयत्न हणून पाडला. पाठोपाठ लगेचच २१व्या मिनिटाला बेल्जियमने कॉर्नर किकला दिशा देत जोरदार आक्रमण केले, पण फ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक ह्युगो लॉरिस याने कमालीची उडी घेत हा गोल रोखला. त्यानंतर ३९व्या मिनिटाला फ्रान्सने केलेले आक्रमण बेल्जियमचा गोलरक्षक कॉर्टोईसने रोखले. त्यामुळे पूर्वार्धात दोनही संघांना एकही गोल करता आला नाही. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या गेल्या १२ सामन्यांपैकी ९ सामने हे पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत सुटले होते.उत्तरार्धात फ्रान्सकडून ५१व्या मिनिटाला बचावपटू सॅम्युअल उमटिटीने हेडरच्या माध्यमातून गोल केला. उमटिटीचा हा कारकिर्दीतील तिसरा गोल ठरला. त्यानंतर आक्रमक खेळ करण्याच्या नादात बेल्जियमला २ पिवळी कार्ड दाखवण्यात आली. सामन्यांच्या निर्धारित वेळेनंतर ६ मिनिटांच्या अतिरिक्त कालावधीतही बेल्जियमला बरोबरी साधता आली नाही.
चौकट
सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहोचणारा देश
फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात गेल्या २० वर्षांत सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत धडक मारणारा देश म्हणून फ्रान्सने नवा विक्रम नोंदवला आहे.१९९८मध्ये पहिल्यांदा फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा २००६ मध्येही फ्रान्सने हा पराक्रम केला. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर यंदा २०१८ मध्ये तिसऱ्यांदा फ्रान्सने ही कमाल साधली आहे.