Breaking News

‘युटेक’ची गळीत हंगामात सर्वोत्कृष्ठ कामगिरी कोल्हापुरात मिळणार बहुमान

संगमनेर/प्रतिनिधी।३०

तालुक्यातील युटेक शुगर लि. साखर कारखान्याने चाचणी गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली आहे. याबद्दल या कारखान्याला भारतीय शुगर तर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉरमन्स ऑफ ट्रायल सिझन’ हा सर्वोच्च बहुमान मिळाला. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भारतीय शुगर ही साखर व्यवसायातील सहकारी आणि खाजगी कारखान्यांना व्यासपीठ उपलब्ध करणारी राष्ट्रीय संस्था आहे. येत्या दि. १४ व १५ जुलै रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात युटेकचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले यांना हा बहुमान देण्यात येणार आहे. युटेक शुगर लि. कारखान्याने २०१७-१८ चाचणी गळीत हंगामात ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. साखरेचा उतारा ११.०६ टक्के इतका मिळाला. परिसरात उसाची उपलब्धता नसतानाही गंगापूर, वैजापूर, नेवासा, राहुरी, निफाड, श्रीरामपूर, पारनेर भागातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे यासाठी साहाय्य घेण्यात आले. विशेष म्हणजे ऊसाची नोंद नसतांना चाचणी गळीत हंगामात ३ लाख मेट्रिक टनाच्यापुढे उसाचे गाळप केले. 

ऊस उत्पादक, तोडणी आणि वाहतूक यंत्रणेने दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सक्षम यंत्रणा, उच्च शिक्षित अनुभवी अधिकारी, कुशल तंत्रज्ञ, कामगार आणि सक्षम व्यवस्थापन यांच्या जोरावर सन २०१८-१९ हंगामात कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. साखर व्यवसायातील अनेक तज्ञांनी तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी ‘युटेक’ला मिळालेल्या यशाबद्दल रविंद्र बिरोले यांचे अभिनंदन केले आहे.