Breaking News

कांबी येथे उन्नत भारत अभियानास प्रारंभ


प्रवरानगर :  प्रवरा फार्मसी पदविका महाविद्यालयात एआयसीटी, नवीदिल्लीच्या अनुदानातून उन्नत भारत अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी दिली. या अभियानासाठी महाविद्यालयापासून १३५ किमी. दूर असलेल्या शेवगाव तालुक्यातील कांबी या गावची निवड करण्यात आली. या अंतर्गत ‘एडस जनजागृती’ व ‘आरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी नुकतीच या गावाला भेट देवून गावात विविध पथनाट्ये सादर करून एडस या गंभीर आजाराबाबत जनजागृती मोहिम राबवली. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय, लोणी येथील संतोष उबाळे यांचे एडस जनजागृतीबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपसरपंच योगेश कुऱ्हे व माजी सरपंच सुनिल रजपूत उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विशाल तांबे यांनी केले.